04 March 2021

News Flash

भारतीय लष्कराचं स्पेशल ऑपरेशन, दृष्टि राजखोवा हाती लागल्याने उल्फाला मोठा झटका

खात्रीलायक टीप मिळाली होती, त्या आधारावर हे ऑपरेशन करण्यात आले....

भारतीय लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेने मेघालय, आसाम, बांगलादेश सीमेवर एक मोठं ऑपरेशन केलं. या ऑपरेशनमध्ये उल्फाचा (आय) उप कमांडर इन चीफ दृष्टि राजखोवा हाती लागला आहे. लष्कराने या ऑपरेशनमध्ये दृष्टि राजखोवा आणि त्याच्या चार साथीदारांना आत्मसमर्पण करायला भाग पाडले.

एसएस कॉरपोरल वेदांता, यासीन असोम, रोपज्योती असोम आणि मिथुन असोम यांनी भारतीय लष्करासमोर आत्मसमर्पण केले. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. खात्रीलायक टीप मिळाली होती, त्या आधारावर हे ऑपरेशन करण्यात आले.

वाँटेड लिस्टमध्ये दृष्टि राजखोवाचे नाव होते. भारतीय यंत्रणा बऱ्याच काळापासून त्याच्या मागावर होत्या. आसामच्या खालच्या भागामध्ये तो कारवाया करत होता. दृष्टि राजखोवाचे आत्मसमर्पण हा उल्फाचा (आय)साठी मोठा झटका आहे. हे ऑपरेशन करुन भारतीय लष्कराने आसाममध्ये शांतता, स्थिरता टिकवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दाखवून दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 2:11 pm

Web Title: top ulfa i leader dirshti rajkhowa surrenders to indian army dmp 82
Next Stories
1 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणामुळेच भारत मंदीच्या फेऱ्यात-राहुल गांधी
2 कोण आहे भाजपाचा सायलेंट व्होटर? नरेंद्र मोदींनी केला खुलासा; म्हणाले…
3 बिहारमध्ये एनडीएची सत्ता आल्यानंतर सोनू सूदने मांडलं परखड मत; म्हणाला…
Just Now!
X