भारतीय हवाई दलाचे प्रशिणार्थी विमान गुरुवारी सकाळी तेलंगणामधील किसारा गावात कोसळले. या विमानाचा वैमानिक सुरक्षित आहे, तसेच कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. या अपघातात कोणीही जखमी झाल्याचीही माहिती समोर आलेली नाही. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातली बातमी दिली आहे.

गुरूवारी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी हा अपघात झाला. हे प्रशिणार्थी विमान हैदराबादच्या हकीमपेट एअरफोर्स स्टेशन वरून निघाले होते. या अपघाताचा शोध हवाई दलाचे कर्नल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.