News Flash

खळबळजनक : प्रसिद्ध गायकाची मुलगी आणि पत्नीसह हत्या

मुलाचे अपहरण करुन आरोपी फरार

प्रसिद्ध गायक आणि भजनकार अजय पाठक यांची पत्नी स्नेहा पाठक, मुलगी वसुंधरा पाठक यांच्यासह हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली असून, आरोपी पाठक यांच्या १० वर्षाच्या मुलाला घेऊन फरार झाला आहे.

अजय पाठक हे उत्तर प्रदेशमधील शामलीतील पंजाबी कॉलनीमध्ये राहतात. मुलगी वसुंधरा पाठक (वय १२) पत्नी स्नेहा पाठक (वय ३६) आणि दहा वर्षांचा मुलगा असे त्यांचे कुटुंब होते. मंगळवारी सकाळी पाच वाजता अजय पाठक यांना सासरी जायचे असल्यामुळे तो सोमवारी तयारी करत होते. पण दुसऱ्या दिवशी बराच वेळ अजय यांच्या घराचे दरवाजे बंद दिसल्यामुळे शेजाऱ्यांनी चौकशी केली. तसेच शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांनी अजय यांच्या घराचे दार तोडले. यावेळी पोलिसांना घरामध्ये अजय पाठक यांच्यासह पत्नी आणि मुलीचा मृत्यदेह आढळून आला. तसेच त्यांच्या घराबाहेरील कार आणि त्यांचा मुलगा बेपत्ता असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 5:24 pm

Web Title: triple murder case international singer ajay pathak family death avb 95
Next Stories
1 पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जिग्नेश मेवानींचा हल्लाबोल
2 १९९२ कोटींच्या मालकाचा लिफ्ट कोसळून दुर्दैवी अंत
3 गगनयान मोहिमेसाठी चार जणांची निवड, एकाही महिला अंतराळवीराचा नाही समावेश
Just Now!
X