News Flash

टर्कीतील आत्मघाती हल्ल्यात ३० ठार; तर ९० जखमी

यामागे आयसिसचा हात असल्याचा दावा तुर्कस्तान सरकारने केला आहे.

तुर्कस्तानातील गजनीटेप शहरातील एका विवाहसोहळ्यात आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू तर ९० पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. टर्की सरकारने हा आतंकवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गजनीटेप शहरातील एका विवाह सोहळ्याला निशाना साधत दहशतवाद्यांनी आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला. या बॉम्बस्फोटात ३० जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात आहे ते अद्याप कळलेले नाही. मात्र, यामागे आयसिसचा हात असल्याचा दावा तुर्कस्तान सरकारने केला आहे. अजून कुठल्याही अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2016 8:21 am

Web Title: turkey wedding blast 30 dead and 90 hurt in gaziantep
Next Stories
1 नरेंद्र मोदींचा सूट गिनेस बुकमध्ये
2 गुगलवर सिंधू, साक्षीच्या जातीचा शोध!
3 ट्रम्प यांच्या प्रचारमोहीम प्रमुखांच्या राजीनाम्यामुळे रशियाशी संबंधांची कबुलीच
Just Now!
X