भारतात तामिळनाडूतील तुतीकोरीन जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वडिल आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसांवर अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. तामिळनाडूमध्ये राजकारण्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच या घटनेचा निषेध केला आहे. प्रसारमाध्यामांच्या वृत्तानुसार पिता-पुत्र दोघांना पोलीस कोठडीत अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.

पी. जयराज (५९) आणि जे. बेनिक्स अशी दोघांची नावं आहेत. १९ जून रोजी लॉकडाउन दरम्यान मोबाइलचं दुकान सुरु ठेवलं म्हणून चौकशीसाठी त्यांना साथाकुलम पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. कोठडीत पोलिसांनी जबर मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

फेनिक्स आजारी पडला व कोविलपत्ती जनरल हॉस्पिटलमध्ये २२ जून रोजी त्याचा मृत्यू झाला व त्याच्या वडिलांचा २३ जून रोजी मृत्यू झाला. पोलिसांच्या या अमानुषतेचा राज्यभरातून निषेध होत असून चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे तर पोलीस निरीक्षकाची बदली झाली आहे. मद्रास उच्च न्यायालयाने पोलिसांकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे.