News Flash

आत्महत्या करताना इंजिनिअर तरुणीसमोर आला प्रियकराचा खरा चेहरा

आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं त्याला आपल्याबरोबर लग्न करायची मुळीच इच्छा नाही हे तिच्या लक्षात आले.

लग्नासाठी मागे लागलेल्या प्रेयसीपासून सुटका करुन घेण्यासाठी प्रियकराने भयानक कट रचला. तो प्रेयसीच्या हत्येला आत्महत्या दाखवणार होता. पण सुदैवाने ती बचावली. लवकरच तिच्या लक्षात आले की, आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं त्याला आपल्याबरोबर लग्न करायची मुळीच इच्छा नाही. या प्रकरणात दोघेही प्रियकर आणि प्रेयसी उच्चशिक्षित इंजिनिअर असून केरळचे आहेत. बंगळुरु मिररने हे वृत्त दिले आहे.

आपले कुटुंबिय लग्नाला कधीच मान्यता देणार नाहीत. एकत्र सुखाने संसार शक्य नाही पण एकत्र जीवन संपवू शकतो असे सांगून त्याने प्रेयसीला आत्महत्येसाठी तयार केलं. प्रेयसीला संपवल्यानंतर कोणाला संशय येऊ नये यासाठी प्रियकराने खोटी चिठ्ठी देखील बनवली. ठरल्याप्रमाणे प्रियकराने प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल ओतलं व तिला पेटवून दिलं. पण प्रियकराने स्वत:ला मात्र पेटवलं नाही. हे तिच्या लक्षात येताच तिने बाथरुममध्ये जाऊन पाणी टाकून आग विझवली. आपल्या हेतूबद्दल प्रेयसीला संशय आलाय हे लक्षात येताच त्याने चूक झाल्याचे मान्य करुन आपण लग्न करु असे तिला आश्वासन दिले.

भाजल्यामुळे त्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दोन महिने तिच्यावर उपचार सुरु होते. या काळात प्रियकर अभावानेच तिला पाहण्यासाठी रुग्णालयात आला. त्यावेळी प्रियकराच्या मनात नेमके काय आहे ते तिला समजले. पीडित तरुणीने पेशाने इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असून तिने आता पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पीडित तरुणी काही वर्षांपूर्वी नवऱ्यापासून विभक्त झाली असून ती आता तिच्या मुलीसोबत राहते. पीडित तरुणी प्रियकरापासून गर्भवती सुद्धा होती. पण त्याने तिला गर्भपात करायला लावला. आरोपी प्रियकर आता फरार झाला असून पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 6:10 pm

Web Title: two engineers man attempt to set her girlfriend ablaze dmp 82
Next Stories
1 नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही : चिदंबरम
2 मेधा पाटकर यांचा पासपोर्ट जप्त
3 टेरर फंडिंग प्रकरण : हाफिज सईदवर आरोप निश्चित
Just Now!
X