सीमा सुरक्षा दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला झाला त्यानंतर चकमक सुरू असताना एक पाकिस्तानी अतिरेकी तेथून पळाला व त्याने एका शाळेत आश्रय घेतला होता, पण त्याने ओलिस ठेवलेल्या दोन जणांनी त्याला जिवंत पकडताना शौर्य गाजवले. महंमद नावेद हा पाकिस्तानातील गुलाम मुस्तफाबाद (फैसलाबाद) चा रहिवासी असून तो वीस वर्षे वयाचा आहे. त्याने शाळेत आश्रय घेतला असता ओलिस ठेवलेल्यांपैकी दोघांनी त्याला पकडले. उधमपूरचे आयुक्त शाहीद इक्बाल चौधरी यांनी सांगितले की, ज्यांना त्याने ओलिस ठेवले त्यांनीच त्याला पकडून अटक करण्यास मदत केली. जो अतिरेकी चकमकीत मारला गेला त्याचे नाव नोमन उर्फ मोमिन असे असून तो पाकिस्तानातील बहवालपूरचा आहे. नावेद याने हल्ल्यानंतर पळ काढला व शाळेत आश्रय घेऊन पाच जणांना नास्सू -सामरौली भागात ओलिस ठेवले.
ओलिस ठेवलेल्या राकेश कुमार याने सांगितले की, आपण
घराबाहेर पडलो तर गोळीबाराचे आवाज आले व या अतिरेक्याने त्याच्याबरोबर चलण्यास सांगितले. त्याआधीच त्याने तीन-चार लोकांना ओलिस ठेवले होते. लष्कर व पोलिस यांनी शाळेला सुरक्षा कडे केले होते.

दुसरा ओलिस विक्रमजित याने सांगितले की, आम्हाला बंदुकीच्या धाकाने सुटकेचा मार्ग विचारण्यात आला. अतिरेक्याने रस्ता दाखवला नाही तर कुटुंबाला मारण्याची धमकी दिली व काही अन्नही देऊ केले.
देसराज सुभाष शर्मा, जीवन
या दोघांनी अतिरेक्याच्या
तावडीतून सुटका करून घेतली. विक्रमजित व राकेश अतिरेक्याशी लढत होते.
विक्रमजितने सांगितले की, मी त्याची मान पकडली तर राकेशने बंदूक पकडली. नंतर त्याने गोळीबार केला पण आम्ही वाचलो. नंतर त्याला पकडले. सुदैवाने शाळेत विद्यार्थी नव्हते कारण काश्मीरमध्ये आयुर्विज्ञान संस्था स्थापण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. अतिरेक्याकडून दारूगोळा
व एके ४७ रायफली जप्त
करण्यात आल्या.