27 January 2021

News Flash

जम्मू-काश्मीर : शोपियांमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

एके-47 रायफल व पिस्तुल हस्तगत

संग्रहीत छायाचित्र

दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील मेलहुरा भागात जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शिवाय, या दहशतवाद्यांकडील एके-47 रायफल व एक पिस्तुल देखील जप्त करण्यात आले आहे. काल सायंकाळापासून सुरू असलेली चकमक आज थांबल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.

चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा काल सायंकाळीच खात्मा करण्यात आला होता. तर दुसऱ्या एका दहशतवाद्यास आज ठार करण्यात आलं. हे दहशतवादी कोणत्या संघटनेशी निगडीत होते याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

आणखी वाचा- दहशतवादी संघटनांसह काश्मीर हादरवण्याचा ISI चा प्लॅन

गुप्तचर विभागास मेलहुरा भागात दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या 55 आरआरच्या एका संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली होती. दरम्यान, जवनांची चाहूल लागताच दडून बसलेल्या दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू करण्यात आला होता. ज्याला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले गेले. आतापर्यंत या वर्षात काश्मीर घाटी परिसरात एकूण १८४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 1:00 pm

Web Title: two terrorists killed by security forces in shopian msr 87
Next Stories
1 केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब सरकार आक्रमक; विधानसभेत मांडला प्रस्ताव
2 विजय सेतुपतीच्या मुलीला बलात्काराची धमकी; मुरलीधरनच्या बायोपिकमध्ये करणार होता काम
3 राहुल गांधींनी शब्द पाळला, सर्वस्व गमावलेल्या ‘त्या’ बहिणींना दिल्या घराच्या चाव्या
Just Now!
X