23 January 2021

News Flash

जम्मूतल्या दादूरा भागात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरु

पुलवामा भागात शोध मोहीम सुरु

जम्मूतल्या दादूरा भागात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.दादूरा हा भाग पुलवामात येतो. या भागात आता शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. आज सकाळीच कुलगाम भागात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ काही वेळापूर्वीच दादूरा भागात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी डोकं वर काढलं असून, दक्षिण काश्मीरमधील पंपोर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले होते. तर तीन जवान जखमी झाले होते.

आज सकाळी कुलागामच्या चिंगम भागात दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानंतर परिसरात वेढा देऊन शोधमोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान परिसरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. जवानांकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. दरम्यान आज दुपारच्या सुमारास पुलवामा भागातील दादूरा या ठिकाणीही दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यांनी या ठिकाणी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 5:53 pm

Web Title: two terrorists killed in an encounter with security forces in dadoora area of pulwama scj 81
Next Stories
1 भारतात केवळ हिंदूंनाच राहण्याचा अधिकार असल्याचं राज्यघटनेत म्हटलेलं नाही- सरसंघचालक
2 ‘आत्मनिर्भर भारत’ म्हणजे ‘लॉलिपॉप’; नक्षलवाद्यांच्या पोस्टर्समुळे झारखंडमध्ये तणाव
3 लडाख सीमेवर चीनकडून ६० हजार सैन्य तैनात, अमेरिकेचा दावा
Just Now!
X