News Flash

जम्मू-काश्मीर : शोपियानमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा

चकमक स्थळावरून शस्त्र आणि अन्य स्फोटक साहित्य हस्तगत

(संग्रहित छायाचित्र )

दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात लष्कराच्या जवानांनी 2 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. चकमक स्थळावरून शस्त्र आणि अन्य स्फोटक साहित्य हस्तगत करण्यात आल्याचीही माहिती आहे. परिसरात शोधमोहीम अद्यापही सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शोपियान जिल्ह्यातील हिंदसीतापूर भागात दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानुसार जवानांनी परिसराची नाकेबंदी केली आणि शोधमोहीम सुरू केली. शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात लष्कराच्या जवानांनी जशास तसं उत्तर दिलं आणि दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.

यापूर्वी शुक्रवारी सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीत इश्फाक अहमद नावाचा एक दहशतवादी ठार झाला होता. त्याच्याकडेही मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा मिळाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2019 12:19 pm

Web Title: two terrorists killed in encounter in jammu and kashmirs shopian
Next Stories
1 खासगी कारचालकांना भाडं घ्यायला मान्यता, सरकार बनवतेय नवा नियम
2 पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसा, टीएमसी-भाजपा कार्यकर्त्याची हत्या
3 आंध्र प्रदेशमध्ये भीषण अपघात, खासगी बस-जीपच्या धडकेत 15 ठार
Just Now!
X