पंजाबमधील अंमली पदार्थाच्या समस्येचे चित्रण करणारा आणि सेन्सॉरशिपच्या वादात अडकल्यानंतर  कायदेशीर अडथळे पार केलेला ‘उडता पंजाब’ हा चित्रपट शुक्रवारी  प्रदर्शित झाला. लुधियाना येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनांव्यतिरिक्त कुठलीही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही. लुधियानात  शिवसेना (हिंदुस्तान) या संघटनेच्या ३० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले.  दरम्यान, या चित्रपटाच्या प्रिंट्स ऑनलाईन ‘लीक’ झाल्याच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयातील सहसचिव (चित्रपट) संजय मूर्ती यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या (सेन्सॉर बोर्ड) कार्यालयाला भेट दिली.