युआयडीएने आधार कार्डशी संबंधीत व्हर्च्युल आयडीची (व्हीआयडी) सुविधा आजपासून (दि.२) सुरु केली आहे. त्यामुळे सर्व कंपन्या लोकांच्या आधार क्रमांकाऐवजी अशा आयडीला स्विकारणे सुरु करतील, असे युआयडीने सांगितले आहे. यासाठी लोकांना आपला एक व्हिआयडी बनवावा लागेल.


आजवर ज्या कामांसाठी आपला आधार क्रमांक द्यावा लागत होता. त्यासाठी आता तो देण्याची गरज भासणार नाही. तर केवळ हा व्हिआयडी सांगितला तरी चालणार आहे. याचा सर्वांत मोठा फायदा हा असेल की लोकांना वारंवार आपला आधार क्रमांक दुसऱ्यांना सांगावा लागणार नाही. एकूणच हा व्हिआयडी आधार क्रमांकासाठी प्राथमिक स्वरुपातील पर्याय म्हणून वापरता येणार आहे.

युजर्सना व्हिआयडी कसा जनरेट करता येईल :

व्हीआयडी आपण स्वतः जनरेट करु शकतो. हा १६ अंकांचा आयडी केवळ एका दिवसासाठी वैध राहिल. त्यानंतर इतर कोणत्याही कामासाठी आपण पुन्हा असा आयडी निर्माण करता येऊ शकतो. याची विशेष बाब म्हणजे कोणीही दुसरी व्यक्ती युझर्सच्या आधार क्रमांकासाठी व्हीआय तयार करु शकत नाही. याला केवळ युझर्सच जनरेट करु शकतो. कारण या आयडीसाठी युजर्सच्या मोबाईलवर ओटीपी क्रमांक येईल.

व्हिआयडीचा वापर कसा करणार? 

युआयडीच्या वेबसाईटवर जाऊन आपण हा व्हिआयडी तयार करु शकतो. यासाठी वेबसाईटवर जाऊन आपल्याला आधार क्रमांक आणि सुरक्षा प्रश्न निश्चित करावे लागतील. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी क्रमांक येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला व्हीआयडी जनरेट करण्यासाठी एक पर्याय दिला जाईल. त्यावर क्लिक केल्यास लगेत तुमच्या फोनवर व्हिआयडी मिळेल. अशा प्रकारे आपण केव्हाही असा व्हिआयडी जनरेट करु शकता.

युआयडीने ट्विटरवर माहिती दिली की, सुरुवातीला या आयडीचा वापर आधारच्या माहितीतील पत्ता ऑनलाइन अपडेट करण्यासाठी केला जाऊ शकतो. तसेच लवकरच आधार क्रमांकाची गजर पडणाऱ्या कंपन्या या व्हिआयडीला स्वकारण्यास सुरुवात करतील. त्यामुळे युआयडीने लोकांना आवाहन केले आहे की त्यांनी त्यांचे व्हिआयडी तयार करावेत. आधार क्रमांकाच्या सुरक्षेसासाठी युआयडीएने हा नवा पर्याय युजर्ससमोर आणला आहे.