19 September 2020

News Flash

#HyderabadEncounter: उत्तर प्रदेश, दिल्ली पोलिसांनी काही शिकायला हवं – मायावती

"हैदराबाद पोलिसांनी जे काम केलं आहे ते कौतुकास्पद आहे."

मायावती

हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर झाल्याच्या घटनेचे उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांनी स्वागत केले आहे. हैदराबाद पोलिसांनी जे काम केलं आहे ते कौतुकास्पद आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून काही शिकायला हवं, असं त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

मायावती म्हणाल्या, उत्तर प्रदेशातही महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. पण राज्य सरकार झोपलं आहे. इथल्या आणि दिल्ली पोलिसांनी हैदराबाद पोलिसांनाकडून प्रेरणा घेतली पाहिजे. मात्र, दुर्देवं आहे की उत्तर प्रदेशातील आरोपींना राज्याचे पाहुणे असल्यासारखी वागणूक दिली जाते. उत्तर प्रदेशात सध्या जंगल राज सुरु आहे, अशा शब्दांत त्यांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 10:25 am

Web Title: up and also in delhi police should take inspiration from hyderabad police says mayawati aau 85
Next Stories
1 #HyderabadEncounter: कायदेशीर मार्गाने फाशी व्हायला हवी होती – अंजली दमानिया
2 “बलात्काऱ्यांना मृत्यूदंडाचीच शिक्षा द्यायला हवी”; माजी मुख्यमंत्र्यांची मागणी
3 #HyderabadEncounter: पोलीस दिसताच शाळकरी विद्यार्थिनींचा जल्लोष
Just Now!
X