05 March 2021

News Flash

अमेरिकेत सतर्कता

अल-कायदाने दिलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्याच्या पाश्र्वभूमीवर अमेरिकेने सर्व विमानतळ आणि रेल्वेस्थानकांवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे.

| August 5, 2013 01:57 am

अल-कायदाने दिलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्याच्या पाश्र्वभूमीवर अमेरिकेने सर्व विमानतळ आणि रेल्वेस्थानकांवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. २२ ठिकाणचे दूतावास सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्याच्या आदेशाबरोबरच जगभरातील अमेरिकन नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत सतर्कता बाळगण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अमेरिकेतील महत्त्वाच्या स्थळांना लक्ष्य करण्याचा इशारा अल-कायदाने दिला आहे. या पाश्र्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून ओबामा प्रशासनाने देशातील सर्व विमानतळ आणि रेल्वेस्थानकांवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. तसेच या व्यवस्थेवर स्वत: अध्यक्ष बराक ओबामा बारकाईने नजर ठेवून आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2013 1:57 am

Web Title: us faces specific al qaeda threat barack obama to keep tab on stepped up security
Next Stories
1 महागाई भत्त्यात वाढ?
2 गुन्ह्य़ाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचीच बदली
3 ‘अ‍ॅपल’ ऐवजी सफरचंद !
Just Now!
X