गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर घालण्यात आलेली व्हिसाबंदी कायम ठेवावी, अशी शिफारस अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय धर्म स्वातंत्र्यविषयक आयोगाने केलीये. अमेरिकी कॉंग्रेसने या आयोगाची निर्मिती केलीये. गोध्राकांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीशी मोदी यांचा संबंध होता, याचा ठोस पुरावे सापडले असल्याचे या समितीने म्हटले आहे.
आयोगाच्या अध्यक्ष कटरिना लॅंटोस स्वेट म्हणाल्या, २००२ मध्ये गुजरातमध्ये उसळलेल्या दंगली आणि राज्यात घडलेल्या ह्रदयद्रावक घटना यांच्याशी मोदी यांचा संबंध होता, याचे ठोस पुरावे सापडले आहेत. त्यामुळे त्यांना अमेरिकी व्हिसा देणे उचित ठरणार नाही.
दरम्यान, धार्मिक स्वातंत्र्याच्या आधारावर या आयोगाने भारताचा समावेश टायर-२ शहरांमध्ये केला आहे. या श्रेणीमध्ये भारताबरोबर अफगाणिस्तान, अझरबैजान, क्युबा, इंडोनेशिया, कझाकस्तान, लाओस आणि रशिया यांचा समावेश आहे.