अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २४ फेब्रुवारीपासून तीन दिवस भारत दौऱ्यावर येणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दौरा कसा असेल ? त्यामध्ये काय काय घडेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र सध्या त्यांची Cadillac Beast ही कार चांगलीच चर्चेत आहे. अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद भुषवणारी व्यक्ती जगातली सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानली जाते. अशा माणसाची लाईफस्टाईल कशी असेल ? ते कोणत्या कारने फिरत असतील असा प्रश्न कुणालाही पडतो. या बातमीतून आम्ही तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत.

बॉम्बस्फोट, रॉकेट लाँचरचा हल्ला सहन करुनही अभेद्य राहणारी डोनाल्ड ट्रम्प यांची ही Cadillac Beast कार डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. बलाढ्य अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला शत्रूही आहेत. त्यामुळेच त्यांच्या सुरक्षेची व्यवस्थाही अत्यंत खास पद्धतीने करण्यात येते. The Beast असं त्यांच्या कारचं नाव आहे.

काय आहेत ट्रम्प यांच्या कारची वैशिष्ट्ये?

  •  डोनाल्ड ट्रम्प यांची कार म्हणजे एक ‘जानदार सवारी’ आहे. डॉर्क ब्लॅक कलर, दमदार इंजिन आणि लिमोझीन कारसारखं डिझाईन ही कारची मुख्य वैशिष्ट्यं आहेत.
  • जगातल्या सर्वात सुरक्षित कार्समध्ये या कारची गणना केली जाते.
  • २४ फेब्रुवारीला जेव्हा गुजरातमध्ये ट्रम्प पोहचतील तेव्हा विमानातून उतरल्यानंतर याच कारने सरदार पटेल स्टेडियमला पोहचतील. ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारची निर्मिती Cadillac ने केली आहे. अमेरिकेतील जनरल मोटर्स कंपनीचा हा एक भाग आहे.
  • ही एक अभेद्य कार आहे बॉम्बस्फोट असो किंवा रॉकेट लाँचरचा हल्ला ही कार अभेद्य राहते.
  • या कारच्या खिडक्या खास पद्धतीने डिझाईन करण्यात आल्या आहेत. पॉलीकॉर्बोनेट आणि ग्लॉसचे पाच लेअर या कारच्या खिडकीला देण्यात आले आहेत. त्यामुळे या कारच्या खिडक्या कोणत्याही ऑटोमेटिक हत्यारातून चाललेल्या गोळ्यांचा मारा सहन करु शकते. या कारची फक्त ड्राईव्ह विंडो ओपन होते. तीदेखील फक्त ३ इंचच उघडते. इतर सगळ्या खिडक्या बंदच राहतात.
  • कारच्या आतमध्ये संकटकालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. पंप अॅक्शन शॉट गन, टीअर गॅस कॅनन, राष्ट्राध्यक्षांसाठी ब्लड बॅग, फायर फायटिंग सिस्टिम, स्मोक स्क्रीन डिस्पेंन्ससर यांचीही व्यवस्था आहे.
  • या कारच्या ड्रायव्हर केबिनमध्येही सॅटेलाईट कम्युनिकेशन सिस्टीम, इंटरनेट कनेक्टिविटी, इमर्जन्सी अॅक्शन सिस्टीम असे फिचर्स आहेत.
  • या कारच्या चालकाला खास प्रकारे प्रशिक्षण देण्यात आले आहे. एवढंच नाही तर कोणतेही नुकसान न होता १८० डिग्रीमध्ये ही कार फिरवता येते
  • या कारमध्ये नाईट व्हिजन कॅमरेचीही सोय आहे. या कारचे टायर कधीही पंक्चर होत नाही. जर स्फोट झाला तर टायर फाटतील पण तरीही त्यांचं काम सुरु राहिल अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे.

वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यं असलेली ही कार खास ट्रम्प यांच्यासाठी तयार करण्यात आली आहे. या कारचं वजन तीन टनापेक्षा जास्त आहे. या कारचे सुरक्षा कोड कायम गोपनीय ठेवले जातात. ही कार जिथे उभी असते तिथल्या परिसरात सिक्रेट सर्व्हिस एजंट हे आधीपासून तैनात कऱण्यात येतात.