22 September 2020

News Flash

सहा मुस्लिम देशांवर अंशत: बंदी, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा

ट्रम्प प्रशासनाचा हा मोठा विजय असल्याचे बोलले जात आहे.

Donald Trump: गेल्या महिन्यात दहशतवादाच्या मुद्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला सार्वजनिकरित्या फटकारले होते. (AP Photo/Susan Walsh, File)

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ इस्लाम बहुल देशांवर घातलेली बंदी अंशत: लागू करण्याची परवानगी दिली आहे. ट्रम्प यांनी सुरूवातीला ७ देशांच्या मुस्लिमांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती. पण न्यायालयाने ही बंदी फेटाळली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी ६ देशांची नावे प्रतिबंध यादीत समाविष्ट केली होती. यामध्ये सीरिया, लिबिया, इराण, सोमालिया, सुदान आणि येमेनच्या नागिरकांचा समावेश होतो. नव्या सूचीतून ट्रम्प यांनी इराकचे नाव वगळले होते. न्यायालयाने बंदीच्या आदेशाला स्थगिती दिल्यानंतर ट्रम्प यांनी यावर टीका करत हा एक अत्यंत वाईट निर्णय असून देशाच्या सुरक्षेसाठी योग्य नसल्याचे म्हटले होते.  ट्रम्प प्रशासनाचा हा मोठा विजय असल्याचे बोलले जात आहे.

ट्रम्प यांच्या ६ देशांच्या प्रवाशांवर बंदी घालण्याचा आदेश अनेक राज्यातील न्यायालयांनी फेटाळला होता. हवाईतील एका न्यायमुर्तींनी तर ट्रम्प यांच्या आदेशाची अंमलबजावणी होण्याच्या काही तास आधीच त्याला स्थगिती दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2017 9:09 pm

Web Title: us supreme court allows donald trump travel ban to partially take effect
Next Stories
1 काही कळायच्या आतच मगरीने त्याचा हात खाल्ला!
2 GST: संसदेच्या मध्यरात्रीच्या विशेष सोहळ्यावर विरोधकांचा बहिष्कार ?
3 बिहारमध्ये राजकीय नाट्य; लालूंच्या मुलाने नितीश कुमारांना म्हटले ‘संधीसाधू’
Just Now!
X