News Flash

सीरियाविरोधात कारवाई तूर्त स्थगित

असाद शासनाने आंदोलकांविरुद्ध रासायनिक अस्त्रांचा वापर केल्याच्या आरोपवरून, सीरियाविरुद्ध लष्करी कारवाई करण्याच्या निर्णयाला

| September 2, 2013 01:08 am

असाद शासनाने आंदोलकांविरुद्ध रासायनिक अस्त्रांचा वापर केल्याच्या आरोपवरून, सीरियाविरुद्ध लष्करी कारवाई करण्याच्या निर्णयाला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी तूर्त स्थगिती दिली आह़े  या कारवाईला अधिक पाठबळ मिळविण्यासाठी त्यांनी अमेरिकी काँग्रेसची परवानगी मिळेपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला आह़े
काळजीपूर्वक विचार केल्यानंतर अमेरिकेने सीरियाविरुद्ध कारवाई करावी, असा निर्णय मी घेतला आह़े  रासायनिक शस्त्रांच्या वापरासाठी आपण असाद शासनाला जबाबदार धरू शकतो, असा मला विश्वास आहे, असे ओबामा यांनी व्हाइट हाऊसमधून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटल़े
असाद शासनाने केलेला हल्ला हा मानवाच्या सन्मानावरील हल्ला आह़े  तसेच जागतिक स्तरावरील रासायनिक अस्त्रबंदीला हरताळ फासणारा आह़े  हे जगात धोका निर्माण करणारे आह़े  त्यामुळे या हल्ल्याला तोंड द्यायलाच हव़े  म्हणूनच अमेरिकेने याविरोधात लष्करी कारवाई करणे गरजेचे आहे, असे ओबामा यांनी आपल्या निर्णयाच्या समर्थनार्थ म्हटले आह़े
लष्कर वापरण्यासाठी मी अमेरिकी काँगेसची परवानगी मागणार आह़े  आणि मी सर्व सदस्यांना विनंती करतो की, आपापसांतील मतभेद विसरून सीरियाविरोधातील या कारवाईला पाठिंबा द्या, असे आवाहनही ओबामा यांनी केल़े  तसेच व्हाइट हाऊसकडून यासंबंधीचा मसुदाही काँगेस सदस्यांना पाठविण्यात आला आह़े  या मसुद्यात अमेरिकेच्या कारवाईसाठी कोणताही निश्चित कालावधी ठरविण्यात आलेला नाही; परंतु या मोहिमेसंबंधीचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार ओबामा यांना देण्याची तरतूद या मसुद्यात आह़े
संयुक्त राष्ट्रांच्या १६ सदस्यांच्या समितीने या कारवाईला पाठिंबा दिलेला नाही़  तरीही त्यांच्या संयुक्त राष्ट्रांच्या संमतीविना पुढे जाण्यात आपल्याला काही गैर वाटत नसल्याचे ओबामा यांचे म्हणणे आह़े
संयुक्त राष्ट्रांच्या चमूला या प्रकरणाच्या तपासणीसाठी काही कालावधी हवा आह़े  मात्र रासायनिक अस्त्रांच्या वापराची केवळ तपासणी करीत बसावयाला नको, तर या संकटाला सामोरेच गेले पाहिजे, असे ओबामा यांनी आपल्या निर्णयाच्या समर्थनार्थ म्हटले आह़े
अमेरिकेचे संरक्षण सचिव चूक हेगल यांनी मात्र तातडीने ओबामा यांना आपला पाठिंबा जाहीर केला आह़े

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2013 1:08 am

Web Title: us to take military action against syrian regime obama
Next Stories
1 बलात्काराचे खटले जलद निकाली काढण्यासाठी कायद्यात बदल हवा
2 देशात दर तासाला एक हुंडाबळी
3 केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १० टक्के वाढ
Just Now!
X