News Flash

मुजफ्फरनगरमध्ये संक्रमण शिबीरात तरुणीवर सामूहिक बलात्कार

मुजफ्फरनगरमधील दंगललग्रस्त भागातील संक्रमण शिबीरात वास्तव्य करणा-या एका तरुणीवर दोन नराधमांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

| November 4, 2013 01:35 am

मुजफ्फरनगरमधील दंगललग्रस्त भागातील संक्रमण शिबीरात वास्तव्य करणा-या एका तरुणीवर दोन नराधमांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या दोन नराधमांची नावे सचिन आणि सुनिल कुमार अशी आहेत. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी नराधमांना चांगलाच मार देऊन पोलिसांच्या हाती सोपले.
सप्टेंबरमध्ये मुजफ्फरनगरमध्ये दंगल उसळली होती. यात सुमारे ६० जणांचा मृत्यू झाला तर हजारो जण बेघर झाले होते. दंगलीत रस्त्यावर आलेले बहुसंख्य मुस्लीम सध्या संक्रमण शिबीरात स्थलांतरीत झाले आहेत. शनिवारी संध्याकाळी जोग्या खेरी गावातील एक तरुणी तिच्या शेतात जात होती. या दरम्यान सुशील आणि सचिनने तिला गाठून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारबाबत कोणाकडे काहीही बोलल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही त्यांनी दिली होती. अखेरीस पिडीत तरुणीने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. यानंतर पिडीत मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या घटनेमुळे जोग्या खेरा गावात तणाव निर्माण झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2013 1:35 am

Web Title: victim at muzaffarnagar relief camp allegedly raped by two youths
Next Stories
1 मेहसूद कारवाईने अमेरिका-पाकमध्ये तणाव?
2 ‘बडी लंबी जुदाई…’ फेम गायिका रेश्मा यांचे निधन
3 ‘बॉम्बस्फोटातील मृत हे हुतात्माच’
Just Now!
X