बंजरंग दलाचे कार्यकर्ते अयोध्येत स्वरक्षणासाठी हाती शस्त्रास्त्र घेऊन प्रशिक्षण घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित कार्यकर्ते आणि आयोजकांवर आता गुन्हा दाखल केला.

अयोध्येत बजरंग दलाने १४ मे रोजी स्वरक्षण आणि शस्त्रास्त्र प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये सहभागी कार्यकर्ते हाती बंदुक घेऊन प्रशिक्षण घेत असताना शिबिरात प्रतिस्पर्ध्यांना मुस्लिम वेशात दाखवण्यात आले होते. यामुळे विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल आयोजक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अयोध्येत बजरंग दलाने शस्त्रास्त्र प्रशिक्षण देणारा हा अशाप्रकारचा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनीही या कार्यक्रमात काहीच चुकीचे नसल्याचे सांगत पाठिंबा दिला होता. तसेच अयोध्येनंतर हा कार्यक्रम इतर ठिकाणी आयोजित करणार असल्याचे बजरंग दलाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे हा वाद आणखी शिगेला पोहोचला. अखेर पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल केला. अर्थात उत्तर प्रदेश निवडणूक जवळ आलेली असताना केवळ मतांच्या ध्रुवीकरणासाठी हे प्रयत्न होत आहेत का, अशीही चर्चा रंगली आहे.

व्हिडिओ-