12 July 2020

News Flash

VIDEO : भारताला मुस्लिममुक्त करण्याची वेळ आलीय- साध्वी प्राची

भारताला काँग्रेसमुक्त करण्याचे ध्येय आपण साध्य केले आहे.

| June 8, 2016 12:16 pm

Sadhvi Prachi : शाहरूख आण आमिर खान भारतात राहून पाकिस्तानचे गोडवे गातात. या दोघांना त्यांची लायकी दाखवून द्या, असे आवाहनही साध्वीने केले आहे.

भारताला आता मुस्लिमुक्त करण्याची वेळ आली आहे, असे विधान करून विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) नेत्या साध्वी प्राचीने नव्या वादाला तोंड फोडले आहे. रूरकी येथे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भारताला काँग्रेसमुक्त करण्याचे ध्येय आपण साध्य केले आहे. आता देशाला मुस्लिममुक्त करण्याची वेळ आली आहे. आम्ही त्यासाठी काम करत आहोत, असे साध्वी प्राची हिने म्हटले आहे. साध्वी प्राचीने यावेळी बॉलीवूड कलाकार शाहरूख खान आणि आमिर खान यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. शाहरूखचे दोन चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आज त्याला हिंदूंची आठवण येत आहे. आमिरचा आगामी ‘दंगल’ चित्रपटही फ्लॉप झाला पाहिजे. शाहरूख आण आमिर खान भारतात राहून पाकिस्तानचे गोडवे गातात. या दोघांना त्यांची लायकी दाखवून द्या, असे आवाहनही साध्वीने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2016 12:15 pm

Web Title: video it is time to make india free of muslims says sadhvi prachi
टॅग Bjp,Bollywood
Next Stories
1 Amazon.in: अॅमेझॉन भारतात आणखी तीन अब्ज डॉलर गुंतवणार, रोजगार निर्मितीची संधी
2 Maharashtra Bullet Train Project : महाराष्ट्राच्या भूमिकेमुळे बुलेट ट्रेनचा प्रकल्प अडकला; मोदींद्वारे मध्यस्थी करण्याचा विचार
3 अमेरिका भारतात सहा अणुभट्टय़ा उभारणार
Just Now!
X