01 March 2021

News Flash

कर्जबुडव्या विजय मल्ल्याला भारतात आणलं जाणार, कुठल्याही क्षणी मुंबईत फ्लाईट लँड करणार

मुंबईतल्या ऑर्थर रोड तुरुंगात होणार रवानगी

संग्रहित छायाचित्र

कर्जबुडव्या विजय मल्ल्याला भारतात आणलं जाणार आहे. कुठल्याही क्षणी त्याला घेऊन मुंबईत विमान लँड होण्याची शक्यता आहे. विजय मल्ल्याच्या विरोधात ९ हजार कोटींचा घोटाळा केल्याचं प्रकरण दाखल आहे. यूके येथील कोर्टाने १४ मे रोजीच त्याच्या प्रत्यार्पणावर मोहोर लावली होती. त्यामुळे त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आता कोणत्याही क्षणी विजय मल्ल्याला घेऊन तपास यंत्रणा मुंबईत येऊ शकतात. तपास यंत्रणांनी IANS ला याबाबतची माहिती दिली आहे. मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातच विजय मल्ल्याची रवानगी केली जाणार आहे.

यू के येथील कोर्टाने १४ मे रोजी विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब केलं होतं. नियमानुसार भारत सरकारने त्या तारखेपासून २८ दिवसांच्या आत यूकेहून भारतात आणलं पाहिजे. प्रत्यार्पणाची कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे.

विजय मल्ल्याला मुंबईत आणण्यात येईल तेव्हा वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीची तपासणीही करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआय आणि ईडीचे अधिकारी विजय मल्ल्यासोबत आहेत. विजय मल्ल्याला थेट कोर्टात नेण्यात येईल. त्याची रवानगी ऑर्थर रोड तुरुंगात केली जाणार आहे.

विजय मल्ल्याला लिकर किंग ही उपाधीही लावण्यात आली होती. तसंच बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय मल्ल्यावर १७ बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. मार्च २०१६ मध्ये विजय मल्ल्या भारत सोडून ब्रिटनला पळाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 9:48 pm

Web Title: vijay mallya extradition fugitive businessman to be flown lodged in mumbai scj 81
Next Stories
1 रानडुकरांपासून संरक्षण करण्यासाठी ठेवलेलं फळ हत्तीणीने खाल्ल्याचा संशय, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
2 गुजरातमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट, पाच जणांचा मृत्यू; ५७ जखमी
3 लडाखमध्ये तुमचा हस्तक्षेप नको, आमचं आम्ही बघू, चीनचं अमेरिकला उत्तर
Just Now!
X