मद्यसम्राट विजय मल्या आणि इतरांनी आयडीबीआय बँकेचे कर्ज बुडविल्याप्रकरणी बँकांनी केलेल्या मनी लॉण्डरिंगच्या तपासासंदर्भातील सहा बँकांचा अहवाल सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) प्राप्त झाला आहे.

मल्या यांना व्यवसायासाठी दिलेल्या कर्जाबाबतचा तपशील देण्याबाबत सहकार्य करावे, अशी विनंती ईडीने बँकांकडे केली होती त्यानंतर सहा बँकांनी हे अहवाल पाठविले आहेत. या अहवालाचा अभ्यास केला जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, किंगफिशर एअरलाइन्स आणि यूही समूहाचे तत्कालीन मुख्य वित्तीय अधिकारी अनुक्रमे ए. रघुनाथन आणि रवी नेदुंगडी यांची सीबीआयने मंगळवारी चौकशी केली.