News Flash

१९ रुपयांत बोला अनलिमिटेड; जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनची नवी ‘ऑफर’

ग्राहकांना आकर्षित कऱण्यासाठी अनोखा फंडा

मोबाईल कंपन्या आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर देऊन कायमच आकर्षित करत असतात. मागील काही दिवसांपासून रिलायन्स जिओने भारतीय मोबाईल ग्राहकांना इंटरनेटसह इतर ऑफर्स देऊन भुरळ घातली होती. या ऑफर्समुळे स्पर्धक कंपन्यांचे ग्राहक जिओकडे आकर्षित झाले होते. याच पार्श्वभूमीवर आता व्होडाफोन इंडिया कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवी आणि अतिशय आकर्षक ऑफर बाजारात आणली आहे.

व्होडाफोनने एक दिवसाचे आणि एक आठवड्याचे असे विविध प्लॅन बाजारात आणले आहेत. १९ रुपयांच्या प्लॅनची वैधता १ दिवसाची असणार आहे. यात ग्राहकांना व्होडाफोन क्रमांकाना पूर्णपणे मोफत कॉल करता येणार असून, १०० एमबीचा ४जी डेटा देण्यात येणार आहे. तर ४९ रुपयांच्या पॅकमध्ये ग्राहकांना सात दिवसांसाठी व्होडाफोनला मोफत लोकल आणि एसटीडी कॉलिंग करता येणार आहे. याशिवाय २५० एमबी इंटरनेट दिले जाणार आहे. अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगबरोबरच ४ जी डेटा दिला जाणार आहे.

या नव्या ऑफर्समधील सर्वात मोठा प्लॅन ८९ रुपयांचा असून, यात ४९ रुपयांच्या प्लॅन इतक्याच सुविधा देण्यात येतील. त्याशिवाय व्होडाफोन सोडून इतर क्रमांकांना कॉल करण्यासाठी १०० मिनिटांचा टॉकटाईम देण्यात आला आहे. हे सर्व प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी उपलब्ध असून ते ग्राहकांना ऑनलाईन, व्होडाफोन स्टोअर आणि रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत.

नुकताच रिलायन्स जिओचे काही टेरिफ प्लॅन हे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय)च्या नियमांमध्ये बसणारे नसल्याचा आरोप व्होडाफोन कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात केला होता. त्यामुळे एकीकडे न्यायालयीन लढाई लढत असताना दुसरीकडे अशाप्रकारे जिओला टक्कर देत आपले बाजारातील स्थान पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 5:57 pm

Web Title: vodafone announced new exciting offer to attract coustemers competition with reliance jio
Next Stories
1 दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्या युद्धनौकेची टेहळणी, चीनचा संताप
2 भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान घाबरले, लष्करी चौक्या मागे हलविल्या…
3 आक्रमक अपप्रचार हाच मोदी सरकारचा एकमेव अजेंडा- काँग्रेस
Just Now!
X