12 August 2020

News Flash

Vvip Chopper dealऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणात ‘ईडी’कडून नवे आरोपपत्र, ख्रिश्चिअन मायकल जेम्स आरोपी

या नव्या आरोपपत्रावर लवकरच न्यायालयात सुनावणी होणार आहे.

ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहारामध्ये सक्तवसुली संचालनालयाने बुधवारी नव्याने आरोपपत्र दाखल केले. विशेष म्हणजे या आरोपपत्रात ब्रिटनचे नागरिक असलेल्या आणि या खरेदी व्यवहारात मध्यस्थाची भूमिका निभावलेल्या ख्रिश्चिअन मायकल जेम्स यांचेही नाव घालण्यात आले आहे. मायकल जेम्स यांच्यासोबतच त्यांचे भारतातील काही सहकाऱ्यांची नावेही आरोपपत्रात घालण्यात आली आहेत.
नवी दिल्लीतील ‘प्रिव्हेंन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट’ विशेष न्यायालयात सक्तवसुली संचालनालयाने १३०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. मायकल जेम्स यांना या हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात तीन कोटी युरो (सुमारे २२५ कोटी रुपये) मिळाल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. ऑगस्टा वेस्टलॅंड कंपनीकडून मिळालेला हा पैसा लाचखोरीच असल्याचे सक्तवसुली संचालनालयाने म्हटले आहे. या नव्या आरोपपत्रावर लवकरच न्यायालयात सुनावणी होणार आहे.
या प्रकरणात एकूण तीन मध्यस्थांपैकी मायकल यांच्या भूमिकेची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी करण्यात आली. सक्तवसुली संचालनालयाने आणि सीबीआयने मायकल यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीससाठी इंटरपोलकडेही धाव घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2016 5:09 pm

Web Title: vvip chopper deal ed files fresh chargesheet names michel james
Next Stories
1 हवाई वाहतुकीच्या नव्या धोरणाला कॅबिनेटची मंजुरी; प्रवाशांसाठी फायदेशीर सुविधा
2 महाराष्ट्रातील ३ पर्यटकांचा पश्चिम बंगालमध्ये अपघाती मृत्यू
3 ‘उडता पंजाब’वरून पंजाबमधील स्वयंसेवी संस्था सुप्रीम कोर्टात
Just Now!
X