महिलांबद्दल अश्लील वक्तव्य केलेल्या मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांचा लाजिरवाणा प्रताप एका व्हिडिओच्या माध्यमातून उघडकीस आला आहे. ‘एएनआय’ने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये मध्य प्रदेशचे गृहमंत्री बाबुलाल गौर हे बसमध्ये चढणाऱया महिलेशी असभ्य वर्तन करत असल्याचे दिसून येते. भोपाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान हा प्रसंग घडला. विशेष म्हणजे, गौर यांना सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात लक्षणीय कामे केल्याबद्दल याआधी अनेकदा गौरविण्यात देखील आहे. मात्र, या व्हिडिओमुळे गौर यांचा खरा चेहरा समोर आल्याची प्रतिक्रिया विरोधकांनी दिली आहे.
दरम्यान, बाबुलाल गौर यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपच्या राज्यस्तरीय संमेलनात बोलताना महिलाबांबत वादग्रस्त विधाने केली होती. यावरून गौर यांच्या माफीनाम्याची मागणी देखील करण्यात आली होती.