भारताचा राष्ट्रवाद हा विविधतेने नटलेला आहे. त्यामुळे अल्पसंख्याकांच्या मतालाही भारतात किंमत आहे. त्यांच्या पाठिंब्याविना कोणताही राजकीय पक्ष सत्ता स्थापन करू शकत नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी भारतातील मुस्लीम मतांचे महत्त्व अधोरेखित केले.
अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद यांच्या १९६ व्या पुण्यतिथिनिमित्त आयोजित येथील एका कार्यक्रमात अय्यर बोलत होते. कोणत्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त व्हावे याचा निर्णय अल्पसंख्याक समाजच घेत असल्याचेही अय्यर म्हणाले. कार्यक्रमस्थळी महिला वर्गही उपस्थित होता व त्यांच्यासाठी बुरख्यांचे वाटप होत होते.