पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अनलॉक २ ची घोषणा करण्यात आली आहे. आपण करोनाशी लढताना आता अनलॉक २ मध्ये प्रवेश करतो आहोत. अशात पावसाळा आला आहे तेव्हा स्वतःची काळजी घ्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. वेळेवर केलेलं लॉकडाउन आणि इतर महत्त्वाचे निर्णय यामुळे भारतात करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहिला. अनलॉक १ मध्ये काही प्रमाणात निष्काळजीपणा वाढताना पाहण्यास मिळाला. हे योग्य नाही असंही मोदींनी म्हटलं आहे. लॉकडाउन सुरु झाल्यानंतर अत्यंत गांभीर्याने नियमांचं पालन करण्यात आलं. आता पुन्हा एकदा राज्य सरकारांना, देशाच्या नागरिकांना आणि संस्थांना अशाच प्रकारची सतर्कता बाळगणं गरजेचं आहे.

आणखी वाचा- सरपंच असो किंवा पंतप्रधान नियमांपेक्षा कोणीही मोठा नाही – नरेंद्र मोदी

खास करुन कंटेटमेन्ट झोनची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. आपल्याला नियम न पाळणाऱ्या लोकांना रोखावं लागेल आणि त्यांना नियमांचं महत्त्व समजावून लागेल असंही मोदींनी म्हटलं आहे. जगातल्या इतर देशांच्या तुलनेत भारतातली परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र आता अनलॉक २ सुरु करताना आपल्याला अधिक काळजी घ्यायची आहे. निष्काळजीपणा करु नका असंही त्यांनी सांगितलं आहे. आज व्हिडीओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाशी संवाद साधला.

आणखी वाचा- ३० नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी भारतीयांना मोफत धान्य देणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

करोना ही जागतिक साथ आहे. त्याविरोधात लढताना आता आपण अनलॉक २ मधे प्रवेश करत आहोत. पण त्यासोबत आता असा ऋतू आला आहे की ज्या काळात सर्दी, खोकला, ताप अशा प्रकारचे आजार बळावतात. त्यामुळे आपल्याला आता जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आपल्याला जबाबदारीनं वागावं लागणार आहे. पण जेव्हापासून अनलॉक १ सुरू झाला तेव्हापासून बेजाबदारपणा वाढला आहे. अनेक लोक लोक आधी मास्क वापरायचे, वेळोलेळी हात धुवायचे. मीटरभराचे अंतर ठेवायचे. आता मात्र, दुसऱ्या अनलॉकमध्ये जाताना लोकांमध्ये बेजाबदारपणा वाढल्याचे दिसते असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.