News Flash

लस देण्यास आणखी किती वेळ लागणार, मोफत असेल की नाही? – अखिलेश यादव

तज्ज्ञ किंवा शास्त्रज्ञांबाबत कधीही प्रश्न उपस्थित केला नसल्याचेही सांगितले.

भारतात करोनावर मात करण्यासाठी सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड व भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आलेली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. असे असताना आता लसीवरून राजकारण सुरू झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेत्यांकडून लसीबाबत शंका उपस्थित केली जात आहे. तर, भाजपाची लस आम्ही घेणार नाही, असं स्पष्टपणे सांगणाऱ्या समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव यांनी आता लस कधी येणार, मोफत असणार की नाही? असे प्रश्न भाजपाला विचारण्यास सुरूवात केली आहे.

“आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की गरिबांना लस कधी मिळेल? मी भाजपाला विचारू इच्छितो की गरिबांना लस देण्यास त्यांना किती वेळ लागेल आणि ती विनामूल्य असेल की नाही? ” असं अखिलेश यांनी भाजपाला विचारलं आहे.

तसेच, “मी किंवा समाजवादी पक्षाने कधीही तज्ज्ञ, संशोधक किंवा शास्त्रज्ञांविषयी प्रश्न उपस्थित केला नाही. जर संशय किंवा काही शंका असतील तर स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी सरकारची आहे.” असं देखील अखिलेश यादव म्हणाले आहेत.

विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी “मी सध्या लसीकरण करून घेणार नाही. भाजपाच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू? जेव्हा आमचे सरकार तयार होईल तेव्हा प्रत्येकाला मोफत लस मिळेल. आम्ही भाजपाची लस घेऊ शकत नाही.” असं त्यांनी म्हटलं होतं.

अखिलेश यादव यांचा बदलला सूर!; आता म्हणतात लसीकरणाची तारीख लवकर घोषित व्हावी

त्यानंतर काल आपला सूर बदलत अखिलेश यादव यांनी “करोना लसीकरण ही एक संवेदनशील प्रक्रिया आहे. त्यामुळे भाजपा सरकारने याला कोणताही सजावटीचा-दिखावा करणारा इव्हेंट समजू नये आणि अगोदरच सर्व व्यवस्था करून याची सुरूवात करावी. हा लोकांच्या जीवनाचा विषय आहे, शेवटी यामध्ये नंतर सुधारणांचा धोका नाही पत्कारता येत. गरिबांच्या लसीकरणाच्या निश्चित तारखेची घोषणा व्हावी.” असं ट्विट करून सारवासारव करण्याच प्रयत्न केला होता.

भाजपाच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू? – अखिलेश यादव

तसेच, “आम्हाला शास्त्रज्ञांच्या कार्यक्षमतेवर संपूर्ण विश्वास आहे. परंतु भाजपाची टाळी-थाळीवाली अवैज्ञानिक विचारसरणी व भाजपा सरकारच्या वॅक्सीन देणाऱ्या वैद्यकीय यंत्रणेवर विश्वास नाही, जी करोनाकाळात ठप्प झाल्यासारखी आहे.” असं देखील अखिलेश यादव ट्विट केलेलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 4:42 pm

Web Title: we want to know when the poor will get the vaccine akhilesh yadav msr 87
Next Stories
1 करोनाच्या नव्या विषाणूचा आजवर ३८ भारतीयांना संसर्ग – आरोग्य मंत्रालय
2 कॉमेडियन मुनावर फारुकीने हिंदू देवतांचा अपमान केल्याचा कोणताही पुरावा नाही – पोलीस
3 गाझियाबाद दुर्घटनेतील मृतांची संख्या २४ वर ; १८ जण जखमी
Just Now!
X