News Flash

“आम्ही त्या सर्वांना मारुन टाकू”; मिझोरामच्या खासदाराने धमकी दिल्यानंतर आसाम पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये

आसाम पोलीस भाग्यवान होते की आम्ही त्या सर्वांना मारले नाही. जर ते परत आले तर आम्ही त्या सर्वांना मारु असे वक्तव्य खासदारांनी केले होते

Well kill them all Assam police in action mode after being threatened by Mizoram MP k vanlalvena
आसाम पोलिसांनी या हिंसाचारामागे कट रचण्यात आला होता आणि मिझोरमच्या खासदारांचा यात सहभाग होता असे सांगितले होते (फोटो सौजन्य ANI आणि AP)

आसाम-मिझोरम दरम्यान सीमा विवाद संपल्याचे दिसत नाही. आता आसाम पोलिसांनी मिझोरामचे राज्यसभेचे खासदार के वनलालवेना यांची चौकशी करण्यासाठी दिल्ली येथे एक पथक पाठविण्याची तयारी केली आहे. मिझोरमच्या खासदाराने त्यांच्यावर सीमेजवळ थांबून हल्ला केल्याचा आरोप केला होता. यासह त्यांनी आसाम पोलिसांना जिवे मारण्याची धमकीही दिली. दोन्ही राज्यांच्या पोलीस दलांमध्ये झालेल्या हिंसाचारात आसाम पोलीस दलातील सहा जण आणि एक नागरीक ठार झाला होता.

आसाम पोलिसांनी या हिंसाचारामागे कट रचला होता आणि मिझोरमचे खासदार यात सामील असल्याचे सांगितले होते. यानंतर खासदार वनलालवेना यांनी आसाम पोलिसांना जिवे मारण्याची धमकी दिली.

संसदेबाहेर बोलताना वनलालवेना म्हणाले होती की, “२०० हून अधिक पोलिसांनी आमच्या भागात प्रवेश केला आणि आमच्या पोलिसांना त्यांच्या जागेवरून मागे ढकलले. आम्ही गोळीबार करण्यापूर्वी त्यांनी गोळीबार करण्याचे आदेश दिले. ते भाग्यवान होते की आम्ही त्या सर्वांना मारले नाही. जर ते परत आले तर आम्ही त्या सर्वांना मारु.”

आसामचे वरिष्ठ अधिकारी जी.पी. सिंह यांनी बुधवारी ट्विटमध्ये म्हटले आहे की त्यांची टीम राज्यसभेचे खासदार के. वनलालवेना यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनाची आणि त्यांच्या घटनेमागील षडयंत्र संबंधित कारवाईची योजना आखत आहे. या कटात त्याच्या सक्रिय भूमिकेचे संकेत आहेत.

कछर जिल्ह्यातील इनर लाइन रिझर्व फॉरेस्ट भागात सोमवारी सकाळी सुरू झालेल्या हिंसाचारात ४५ लोक जखमी झाले. हिंसाचारानंतर दोन्ही राज्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. अशांत भागात शांतता राखण्यासाठी निमलष्करी दले तैनात करावी लागली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2021 11:55 am

Web Title: well kill them all assam police in action mode after being threatened by mizoram mp abn 97
Next Stories
1 अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन एम्स रुग्णालयात दाखल
2 “तालिबानी लोक हे सामान्य नागरिक; अमेरिकेमुळे परिस्थिती खराब झाली”; इम्रान खान यांचा आरोप
3 बँका बुडवण्याची प्रेरणा कोणाची?; केंद्राच्या निर्णयानंतर संजय राऊतांचा सवाल
Just Now!
X