व्हॉट्सअ‍ॅप संदेशांचे मूळ शोधणारी यंत्रणा विकसित करण्याची भारताची सूचना व्हॉट्सअ‍ॅपने धुडकावली आहे. यामुळे आमच्या वापरकर्त्यांच्या खासगीपणाच्या हक्कांचे उल्लंघन होईल, असे कारण व्हॉट्सअ‍ॅपने दिले आहे. हे माध्यम व्यक्ती-व्यक्तींमधील खासगी संवादाचे माध्यम आहे. त्यामुळे कुणाच्याही संदेशाचा माग घेऊन तो उघड करणे हा त्यांच्या गोपनीयतेचा भंग आहे. या माध्यमातून अपप्रचार होऊ नये, ही भूमिका रास्त आहे. पण त्यासाठी लोकप्रबोधन हाच उपाय आहे, असे व्हॉट्सअ‍ॅपने स्पष्ट केले.

माहितीचे गुगल ड्राइव्हवरील जतन बंद

व्हॉट्सअ‍ॅप आणि गुगलमधील नवीन करारानुसार व्हॉट्सअ‍ॅपवरील माहिती १२ नोव्हेंबरनंतर आपोआप गुगल ड्राइव्हमध्ये जतन होणार नाही. आता आपले संवाद, संदेश, छायाचित्रे, चित्रफिती आदी माहिती ३० ऑक्टोबपर्यंत जतन करावी लागेल, अन्यथा ती नष्ट होईल. १२ नोव्हेंबरनंतरही व्हॉट्सअ‍ॅपवरील माहिती गुगल ड्राइव्हला जतन करायची असेल, तर ती स्वत:ला (मॅन्युअली) करावी लागणार आहे. वापरकर्त्यांने स्वत: बॅकअप न घेतल्यास तो ड्राइव्ह मध्ये दिसणार नसल्याचे व्हॉटसअ‍ॅपकडून जाहीर करण्यात आले आहे. यामुळ गुगल ड्राइव्हवरील ताण कमी होणार आहे.  माहिती जतनासाठी गुगलच्या सहकार्याने व्हॉट्सअ‍ॅप स्वतंत्र प्रणाली उभारणार आहे. ज्यात गुगल ड्राइव्हच्या पंधरा जीबी व्यतिरिक्त ही साठवण्याची क्षमता असणार आहे.