11 August 2020

News Flash

मंत्र्याच्या बनावट गुणपत्रिकेवरून काँग्रेस आक्रमक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांवर काँग्रेसने जोरदार टीका केली. केंद्रीय मंत्रिमंडळात मनुष्यबळ विकास राज्यमंत्री म्हणून नुकतेच नियुक्त झालेले रामशंकर कथेरिया यांचे गुणपत्रक बनावट

| November 15, 2014 04:16 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांवर काँग्रेसने जोरदार टीका केली. केंद्रीय मंत्रिमंडळात मनुष्यबळ विकास राज्यमंत्री म्हणून नुकतेच नियुक्त झालेले रामशंकर कथेरिया यांचे गुणपत्रक बनावट असल्याच्या मुद्दय़ावरून काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी टीकेची झोड उठवली. न केलेल्या कामाचे श्रेय घेणारे पंतप्रधान मोदी हे आपल्या कार्याचे ‘तुणतुणे’ वाजवत असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. त्यांनी ट्विट केले आहे, ‘की प्रथम मनुष्यबळ विकासमंत्री म्हणून इराणी आणि आता राज्यमंत्री म्हणून नियुक्त केलेले कथेरिया हे दोन्हीही पदवीधर नाहीत, हे सिद्ध झाले आहे. यावर कळस म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शालेय पुस्तके आणि देशाचा इतिहास बदलायचा आहे’.
काँग्रेस महासमितीच्या प्रसिद्धी विभागाचे अध्यक्ष अजय माकेन यांनीही ‘ट्विट’ केले आहे. ते लिहितात, की राज्यमंत्र्याचे खोटे प्रतिज्ञापत्र ही शिक्षण मंत्रालयाला भाजपने दिलेली भेट आहे. हेच का मोदींचे स्वच्छ राजकारण?
काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांनी भाजपवर शरसंधान साधताना स्मृती इराणी यांनी आपल्या शिक्षणाविषयी निवडणूक आयोगाला परस्परविरोधी प्रतिज्ञापत्रे सादर केल्याकडेही लक्ष वेधले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2014 4:16 am

Web Title: will resign as minister mp if proved guilty katheria
Next Stories
1 ‘अलिगढ’च्या विद्यार्थ्यांची स्मृती इराणींवर टीका
2 जी-२० मध्ये काळ्या पैशावर चर्चा
3 सरकारी विधिज्ञांच्या खासगी खटल्यांवर अंकुश
Just Now!
X