देशभरात मागील २४ तासांमध्ये ४६ हजार २५४ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, ५१४ रुग्णांचा मृत्यूंची नोंद झाली आहे. तर, दिलासादायक बाब म्हणजे, याच कालावधीत ५३ हजार ३५७ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील मिळाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ८३ लाख १३ हजार ८७७ वर पोहचली आहे. करोना संसर्गाचा वेग हळूहळू कमी होताना दिसत आहे.

देशातील एकूण ८३ लाख १३ हजार ८७७ करोनाबाधितांमध्ये ५ लाख ३३ हजार ७८७ अक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले ७६ लाख ५६ हजार ४७८ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ लाख २३ हजार ६११ जणांच्या संख्येचा समावेश आहे.

३ नोव्हेंबरपर्यंत देशात ११, २९, ९८,९५९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यातील १२ लाख ९ हजार ६०९ नमूने काल तपासण्यात आले असल्याची माहिती आयसीएमआरच्या हवाल्याने देण्यात आली आहे.