सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक तरुणी घराखाली असलेल्या मोकळ्या जागेत घुसताना दिसत आहे. काही वेळात ही तरुणी तब्बल आठ किलो वजनाच्या जिवंत अजगराला अत्यंत सहजपणे हातात पकडून बाहेर येताना दिसते. तरुणीने हा व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केला असून, तुफान व्हायरल होत आहे. या तरुणीसाठी हे काही नवं नसून आधीपासूनच ती जंगली जनावरांना पकडण्याचं काम करत आहे. घरांमध्ये साप, अजगर घुसला असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही तरुणी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचते आणि त्यांना पकडते. डेली मेलने तरुणीच्या या कौशल्यावर विशेष लेखही प्रसिद्ध केला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तरुणीला सलाम करत आहेत.

युकेमधील एका घरात आठ किलो वजनाचा अजगर घुसला होता. घरात घुसताच अजगराने पाळीव मांजरीची शिकार केली होती. हे पाहिल्यानंतर घरातील लोक घाबरले. आपली लाडकी मांजर मारली गेल्याचं दुख: त्यांना झाला होतं. यानंतर त्यांनी तात्काळ ब्रायडी मारोला कळवलं. ब्रायडी मारो व्यवसायाने इलेक्ट्रिशिअन असून, साप पकडण्यात तिचं कौशल्य आहे. माहिती मिळताच, ब्रायडी मारो घरी पोहोचली आणि काही मिनिटातच अजगराला पकडलं.

<>;

अजगर पकडत असतानाचा व्हिडीओ ब्रायडी मारोने पोस्ट केला आहे. फक्त दोन दिवसांत जवळपास 50 हजाराहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. गेल्या 15 वर्षांपासून ब्रायडी मारो वाइल्ड लाइफ हॅण्डलर म्हणून काम करत आहे. ज्या घरातून जिवंत अजगर पकडण्यात आला आहे, त्याचं म्हणणं आहे की मांजर त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे होती. तिच्या जाण्याने आपल्याच घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यासारखं वाटत आहे.