हिंदू मुलीशी लग्न करण्यासाठी छत्तीसगढमधील एका ३३ वर्षीय मुस्लिम मुलाने हिंदू धर्म स्विकारला होता. आणि पत्नीला पालकांपासून मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टात मुलीने युटर्न घेत आपल्याला पालकांसोबत राहण्याची इच्छा असल्याचे सांगत तरूणाची साथ सोडली आहे.
छत्तीसगडमधील २३ वर्षीय अंजली जैनने आपल्याला पालकांसोबत राहण्याची इच्छा असल्याचं सुप्रीम कोर्टात सांगितले. 33 वर्षीय मोहम्मद इब्राहिम सिद्दीकी याने अंजलीसाठी हिंदू धर्मात परिवर्तन केलं होतं. मुलीच्या पालकांनी लग्नानंतर तिला सासरी राहण्यास नकार दिला होता. त्यामुळे हे प्रकरण कोर्टात गेले होते. सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि जस्टिस डीव्हाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर अंजलीने जबाब नोंदवला. अंजलीची इच्छा आणि ती 18 वर्षांवरील असल्याचं लक्षात घेत न्यायालयाने तिला पालकांसोबत राहण्याची अनुमती दिली.

हिंदू मुलीशी लग्न करण्यासाठी छत्तीसगढमधील ३३ वर्षीय मोहम्मद इब्राहिम सिद्दीकीने २३ वर्षीय प्रेयसी अंजली जैनशी लग्न करण्यासाठी हिंदू धर्म स्वीकारला होता. मोहम्मदने हिंदू धर्म स्विकारल्यानंतर आपले नामकरण आर्यन आर्य असे केले. अंजली आणि सिद्दीकी यांचे लग्नापूर्वी दोन-तीन वर्ष प्रेमप्रकरण सुरू होते. 23 फेब्रुवारी 2018 ला त्याने धर्मपरिवर्तन केलं. 25 फेब्रुवारीला छत्तीसगडच्या रायपूरमधील आर्य समाज मंदिरात दोघं लपूनछपून विवाहबंधनात अडकले होते.

छत्तीसगढ उच्च न्यायालयामध्ये त्याने प्रथम याबाबत दाद मागितली होती. पण कोर्टाने अंजीलीच्या घरच्यांच्या बाजूने निर्णय दिला होता. आर्यनने त्यावेळी या निर्णयाला आव्हान करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पत्नीच्या जीवाला धोका असल्याचा युक्तीवाद अर्यनने मांडला होता. घरच्यांच्याविरोधात जाऊन लग्न केल्यामुळे अंजलीवर राग काढत असल्याचा आरोपही त्याने केला होता.

मी माझ्या मर्जीने लग्न केले आहे. २३ वर्षाची असून बालिक आहे. माझे निर्णय मी स्वत: घेऊ शकते असे अंजलीलने छत्तीसगढ कोर्टामध्ये सांगितले होते. मात्र आता सुप्रीम कोर्टात अंजलीने आपला जबाब बलदल्यामुळे दोघेही वेगळे झाले आहेत. कोर्टाने मुलीचा जबाब ऐकून घेऊन पालकांसबोत राहण्यास परवानगी दिली आहे.