24 October 2020

News Flash

धक्कादायक ! रात्रीच्या निवाऱ्यासाठी थांबलेल्या मित्राच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार

आरोपीने मदतीचा बहाणा करत आपल्या मित्रांसोबत महिलेवर सामूहिक बलात्कार केला

रात्रीच्या निवाऱ्यासाठी मदत मागणाऱ्या मित्राच्या पत्नीवरच बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला लुधियाना जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या आपल्या पतीला भेटण्यासाठी आली होती. यावेळी तिने पतीच्या मित्राकडे रात्रीच्या निवाऱ्यापुरती मदत मागितली होती. यावेळी आरोपीने मदतीचा बहाणा करत आपल्या मित्रांसोबत महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

महिला पतीला भेटण्यासाठी लुधियाना कोर्टाबाहेर थांबली होती. पण पतीची भेट होऊ न शकल्याने तिने रात्रीसाठी लुधियानातच थांबण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या पतीचा मित्र विक्रमजीत सिंह याला फोन केला. एका प्रकरणात तो पतीसोबत सहआरोपी होता. विक्रमजीत याने पीडित महिलेलला रात्रीच्या राहण्याची व्यवस्था करतो सांगत तिला आपल्या घऱी आणलं.

विक्रमजीतने महिलेला घरी आणण्यासाठी आपला भाऊ भवन याला कोर्टाजवळ पाठवलं होतं. भवन आपल्या मित्रांसोबत गेला. पण तिला विक्रमजीतच्या घरी नेण्याऐवजी भलत्याच ठिकाणी नेण्यात आलं. काहीतरी चुकीचं घडत असल्याचं वाटल्याने महिलेने विक्रमजीतला फोन करुन त्याच्या कुटुंबाची चौकशी केली. यावेळी त्याने आपण नवीन घरात शिफ्ट झालो असून, आई आणि पत्नी घरात नसल्याचं सांगितलं.

आरोपी भवन याने पीडित महिलेला गुंगीचं औषध मिसळलेलं पेय पिण्यास दिलं. यानंतर महिला बेशुद्द पडली. जेव्हा महिला शुद्धीवर आली तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते. महिलेने तेथून पळ काढला आणि पोलीस स्थानक गाठलं. महिलने भवन आणि त्याच्या मित्रांवर बलात्काराचा आरोप केला आहे. दरम्यान या प्रकऱणात विक्रमजीतचा काही संबंध आहे का याची चाचपणी करत आहेत. पोलीस तपास करत असून अद्याप याप्रकरणी कोणतीही अटक झालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 12:44 pm

Web Title: woman gangraped by husband friends in ludhiana sgy 87
Next Stories
1 लष्कराने का घातले व्हॉट्सअॅप वापरावर निर्बंध, जाणून घ्या कारण…
2 प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी पतीची हत्या, मुलांची आईला फाशीची शिक्षा देण्याची मागणी
3 काश्मीर मुद्द्यावर ट्रम्प काय बोलत आहेत त्यांना ठाऊक नाही-शशी थरुर
Just Now!
X