News Flash

काँग्रेस जेवढी मागे जाईल, तेवढाच देश पुढे जाईल – बबिता फोगाट

बबिताच्या ट्विटवर सोशल मीडियवर संमिश्र प्रतिक्रीया

भारताची महिला कुस्तीपटू आणि काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केलेल्या बबिता फोगाटने काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. काँग्रेस पक्षाची जेवढी पिछेहाट होईल तेवढाच देश पुढे जाईल असं ट्विट बबिताने केलं आहे.

देशात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करत असलेल्या काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी सरकारवर वारंवार टीका करत आहेत. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सांभाळण्यात आलेलं अपयश, गलवान खोऱ्यात चीनसोबत संघर्षावरुन भारताची भूमिका अशा अनेक धोरणांवरुन राहुल गांधीनी भाजपाला टीकेचं लक्ष्य बनवलं होतं. सध्या राजस्थानमधील सत्तासंघर्षावरुन काँग्रेस आणि भाजपात मोठा संघर्ष सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बबिताने हे ट्विट केलं असावं अस अंदाज बांधला जात आहे.

बबिताच्या या ट्विटरवर नेटकऱ्यांच्या मात्र संमिश्र प्रतिक्रीया पहायला मिळत आहेत. राजकारणात प्रवेश केल्यापासून बबिता आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी सोशल मीडियावर चांगली चर्चेत असते. त्यामुळ बबिताने केलेल्या या टीकेवर येत्या काही दिवसांत काँग्रेस पक्षाकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 10:02 pm

Web Title: wrestler and bjp leader babita phogat criticize congress party psd 91
Next Stories
1 देशविरोधी वक्तव्य करणारा शरजील इमाम करोना पॉझिटिव्ह
2 करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची अमरनाथ यात्रा रद्द
3 करोना विषाणू म्हणजे देवानं आपल्या पापांची दिलेली शिक्षा : शफीकुर्रहमान बर्क
Just Now!
X