24 September 2020

News Flash

यासिन भटकळच्या एनआयए कोठडीत आणखी वाढ

इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी यासिन भटकळच्या एनआयए कोठडीत मंगळवारी चार दिवसांनी वाढ करण्याचा निर्णय दिल्लीतील न्यायालयाने दिला.

| September 17, 2013 05:02 am

इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी यासिन भटकळच्या एनआयए कोठडीत मंगळवारी चार दिवसांनी वाढ करण्याचा निर्णय दिल्लीतील न्यायालयाने दिला. यासिन भटकळ आणि त्याचा साथीदार असदुल्ला अख्तर यांना मंगळवारी कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत दिल्लीतील न्यायालयात आणण्यात आले. 
यासिनच्या एनआयए कोठडीत २१ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. यासिन भटकळ आणि असदुल्ला अख्तर यांना बिहारमधील नेपाळच्या सीमेवरून २९ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. देशात २००६ पासून पुणे, हैदराबाद, बेंगळुरू, अहमदाबाद, दिल्ली आणि सूरतमध्ये झालेले वेगवेगळे बॉम्बस्फोट यासिन भटकळ आणि त्याच्या साथीदारांनीच घडवून आणले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2013 5:02 am

Web Title: yasin bhatkals nia custody extended by four days
Next Stories
1 अमेरिकेच्या नौदल तळावर हल्ला; १३ ठार
2 बदलासाठी हाक
3 दंगलींमागील समाजकंटकांना कठोर शिक्षा करू – पंतप्रधान
Just Now!
X