दिल्लीतील जवाहरलाला नेहरु विद्यापीठात (जेएनयू) काल विद्यार्थ्यांना झालेल्या अमानुष मारहाणीचे पडसाद आज दिवसभर देशभरात उमटताना दिसून आले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांसह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत निदर्शनं करण्यात आली. काल घडलेल्या या घटनेत जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयेषी घोष हिला देखील जबर मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये तिच्या डोक्याला मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली होती. जखमी अवस्थेतील आयेषीचा व्हिडिओ देखील माध्यमांवर आला होता. याप्रकरणी आता आयेषीने विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, हा हल्ला आरएसस व अभाविपच्या गुंडांनी घडवला असल्याचा देखील असल्याचा देखील आरोप केला आहे.

‘जेएनयू’ मध्ये काल घडलेल्या हाणामारीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज यामध्ये जखमी झालेली विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयेषी घोष हिने माध्यमांशी संवाद साधला. मागील चार-पाच दिवसांपासून आरएसएसशी निगडीत असलेले काही प्राध्यापक आमचे आंदोलन दडपण्यासाठी हिंसाचारास प्रोत्साहन देत होते. जेएनयूचे सुरक्षा रक्षक व हल्लेखोरांचे संबंध आहेत. त्यामुळेच त्यांनी हल्ला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, हा एक संघटीत हल्ला होता, ते एकेकाला बाहेर काढत होते व मारहाण करत होते,असे आयेषी म्हणाली. तसेच, आम्ही जेएनयू व दिल्ली पोलिसांकडे सुरक्षा मागून आम्ही चुक करत आहोत का? असा प्रश्न देखील तिने उपस्थित केला.

आम्ही या हल्ल्याचा निषेध नोंदवतो. तसेच, तत्काळ कुलुगुरूंना हटवले जावे अशी आमची इच्छा आहे. काल झालेला हल्ला हा आरएसएस व अभाविपच्या गुंडांद्वारे करण्यात आला होता. मागील चार-पाच दिवसांपासून आरएसएस व अभाविपशी निगडीत असलेल्या प्राध्यपकांकडून हिंसाचारास प्रोत्साहन दिले जात होते.

काही वेळापूर्वीच आयेषी घोष हिला दिल्लीती एम्स रुग्णालायतून उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. रविवारी घडेलेल्या हाणामारीच्या घटनेत तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली होती. जेएनयूएसयूने आरोप केला आहे की, आरएसएसशी निगडीत असलेल्या अभाविपच्या सदस्यांनी त्यांच्यावर दगडफेक देखील केली.