News Flash

“माझी लढाई अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांविरोधात नाही, तर…”; योगगुरु रामदेव यांनी मांडली बाजू

योगगुरु रामदेव आणि आयएमए वाद

करोनाच्या दुसऱ्या लाटेत योगगुरु रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर टीकेची झोड उठवली आहे. या टीकेनंतर आयएमएनं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांना याची दखल घेण्यास सांगितलं आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली आहे. तसेच फेडरेशन ऑफ रेजिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडियानं १ जून रोजी संपूर्ण देशात काळा दिवस पाळण्याची घोषणा केली आहे. आता योगगुरु रामदेव यांनी ट्वीट करत आपली बाजू मांडली आहे.

“मी अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांविरोधात नाही. आयएमएविरोधात जाण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र आमचा या क्षेत्रातील माफियांना विरोध आहे. ते दोन रुपयांचं औषध दोन हजार रुपयांना विकत आहेत. तसेच आवश्यकता नसताना ऑपरेशन आणि चाचणी करण्याचा सल्ला देत आहेत. तसेच औषधांचा धंदा करतात. आम्ही हा वाद संपवू इच्छित आहे.”, असं ट्वीट योगगुरु रामदेव यांनी केलं आहे.

“जर अ‍ॅलोपॅथीत शस्त्रक्रिया आणि जीव वाचवण्याची औषधं आहेत. तर ९८ टक्के आजारांना योग आणि आयुर्वेदमध्ये समाधान आहे. योग-आयुर्वेद यांना स्यूडो सायन्स आणि अल्टरनेटिव थेरपी बोलणं खिल्ली उडवण्यासारखं आहे. ही मानसिकता देश सहन करणार नाही”, असंही ट्वीट त्यांनी केलं आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेला धक्का; जीडीपीत ७.३ टक्क्यांची घसरण

योगगुरु रामदेव यांनी यापूर्वी अ‍ॅलोपॅथी औषध कंपन्या आणि इंडियन मेडिकल असोसिएशला २५ प्रश्न विचारले होते. काही आजारांवर ठोस उपाय आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले होते. तसेच अ‍ॅलोपॅथीत उपचार इतके गुणकारी आहेत, तर अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनी आजारी पडणं योग्य वाटत नाही, असा टोलाही हाणला होता. थॉयरॉइड, ऑर्थरायटीस, कोलायटिस, दमा आणि हेपेटायसिस यासारख्या आजारांवर एक एक करत त्यांनी २५ प्रश्न विचारले होते. या प्रश्नाचं पत्रक त्यांनी ट्विटरवर शेअर केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 8:44 pm

Web Title: yogguru ramdev says i am not against ima and doctors rmt 84
Next Stories
1 करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेला धक्का; जीडीपीत ७.३ टक्क्यांची घसरण
2 तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रांनी उडवली मोदी-शाहांची खिल्ली; ट्विट केलं कार्टून
3 केंद्र सरकार VS पश्चिम बंगाल सरकार: अल्पन बंडोपाध्याय यांची मुख्य सल्लागारपदी नियुक्ती
Just Now!
X