News Flash

नामांतरानंतर आता अयोध्येत लवकरच दारु आणि मांसबंदी ?

जिल्ह्यात दारु आणि मांस विक्री होणे हा प्रभू श्रीरांमाचा अपमान आहे. मांस आणि दारुमुळे हिंसा आणि प्रदूषणाला प्रोत्साहन मिळते.

प्रभू श्रीरामांचे स्थान समजले जाणाऱ्या अयोध्यामध्ये आता सरकार दारु आणि मांसबंदी लागू करण्याच्या तयारीत आहे.

उत्तर प्रदेशमधील फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून अयोध्या करण्यात आले आहे. प्रभू श्रीरामांचे स्थान समजले जाणाऱ्या अयोध्यामध्ये आता सरकार दारु आणि मांसबंदी लागू करण्याच्या तयारीत आहे. संतांनी केलेल्या मागणीवरुन सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने संपूर्ण अयोध्या जिल्ह्यात दारु आणि मांसबंदीबाबत कायदेशीर सल्ला मागितला आहे.

राज्य सरकारचे प्रवक्ते श्रीकांत शर्मा म्हणाले की, अयोध्येतील संतांनी संपूर्ण जिल्ह्यात दारु आणि मांसबंदीची मागणी केली आहे. सरकारने याप्रकरणी विधी विभागाचा सल्ला मागितला आहे. पूर्वी हा फैजाबाद जिल्हा होता. या जिल्ह्यातील अयोध्या शहरात दारु आणि मांसबंदी होती. आता फैजाबाद जिल्ह्याचे नामांतर करण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्यात आता बंदीची मागणी करण्यात आली आहे.

संतांनी याबाबत म्हटले की, जिल्ह्यात दारु आणि मांस विक्री होणे हा प्रभू श्रीरांमाचा अपमान आहे. राम जन्मभूमीचे पुजारी स्वामी सत्येंद्र दास यांच्या नेतृत्वाखाली संतांनी प्रशासनाला ही मागणी केली आहे. मांस आणि दारुमुळे हिंसा आणि प्रदूषणाला प्रोत्साहन मिळते. राम नगरीसाठी हे चांगले नाही. त्यामुळे यावर बंदी हवी.

अयोध्येत दारु आणि मांस विक्रीवरील बंदीची योजना चांगली असल्याचे म्हणत विश्व हिंदू परिषदेच्या प्रवक्त्याने याचे स्वागत केले आहे. धार्मिक नगरात दारु आणि मांस विक्रीमुळे संत त्रस्त असल्याचेही त्यांनी म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 1:51 pm

Web Title: yogi sarkar in preparation of ban on meat and liquor in entire ayodhya district
Next Stories
1 Rape Act: पुरूषांप्रती असलेला लिंगभेद संसदेनेच दूर करावा – सुप्रीम कोर्ट
2 जामिनावर फिरणारे आई आणि मुलगा मला प्रामाणिकपणा शिकवत आहेत-मोदी
3 सीबीआय वाद; सीव्हीसीचा अहवाल सुप्रीम कोर्टापुढे, पुढील सुनावणी शुक्रवारी
Just Now!
X