श्रीनगर शहरामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सोमवारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (सीआयएसएफ) एक जवान शहीद झाला आणि दुसरा जखमी झाला. इक्बाल पार्क बाजाराजवळ हे दोन्ही जवान सकाळी साडेदहाच्या सुमारास खरेदी करीत असताना, अचानक त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला चढविला.
हल्ला झाला त्यावेळी जवानांकडे कोणतेही शस्त्र नव्हते. दोन दहशतवाद्यांनी सायलेन्सर बसविलेल्या बंदुकीतून जवानांवर गोळीबार केला. हल्ल्यानंतर लगेचच दोन्ही जवानांना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच एका जवानाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर इक्बाल पार्कचा परिसर रिकामा करण्यात आला असून, दहशतवाद्यांचा कसून शोध घेण्यात येतो आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Sep 2013 रोजी प्रकाशित
श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जवान शहीद
श्रीनगर शहरामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सोमवारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (सीआयएसएफ) एक जवान शहीद झाला आणि दुसरा जखमी झाला.

First published on: 23-09-2013 at 11:48 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 crpf jawan killed in militant attack in srinagar