मेलबर्न : मध्य मेलबर्न येथे एका व्यक्तीने अचानक एक मोटार पेटवून दिली नंतर तीन जणांना प्राणघातक पद्धतीने भोसकले त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. नंतर हल्लेखोराला गोळ्या घालून ठार करण्यात आले. हा हल्ला दहशतवादी स्वरूपाचा होता असा निर्वाळा ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी दिला आहे. दरम्यान परदेशी लोकांना लक्ष्य करण्यासाठी हे कृत्य केल्याचे सांगून आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिक्टोरियाचे पोलीस आयुक्त ग्रॅहॅम अ‍ॅशटन यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीने तिघांना भोसकले व पोलिसांवर हल्ला केला त्याचा नंतर जखमी अवस्थेत रुग्णालयात मृत्यू झाला. हा दहशतवादाचाच प्रकार होता. यातील संशयित हा आम्हाला परिचित असलेल्या गुन्हेगारांपैकी असावा. पण त्याचे नाव  जाहीर करता येणार नाही.

दहशतवादाचे प्रकरण म्हणून याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. व्हिक्टोरिया पोलीस व संघराज्य गुप्तचरांना हल्लेखोराची ओळख माहिती आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 killed in isis attack in australia
First published on: 10-11-2018 at 02:33 IST