अवंतीपोरा सेक्टरमध्ये दहशतवाद्याचा खात्मा

मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील हस्तगत

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील अंवंतीपोरा सेक्टरमध्ये आज झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात आला आहे. परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

या अगोदर जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये जवानांकडून शोधमोहीम राबवली जात असताना, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले होते.

पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद थांबला नाही तर ‘प्रतिव्यूहात्मक कारवाई’ करण्याचा पूर्ण अधिकार भारताला असेल, असा इशारा नवे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी पदभार स्वीकारताच पाकिस्तानला दिलेला आहे. “भारताच्या सर्व सीमांवर सैन्य तैनात आहे. गरज पडल्यास अगदी जम्मू-काश्मीरसाठीही आमच्या विशेष योजना तयार आहेत. या योजना अंमलात आणल्या जाऊ शकतात. आम्हाला एखादी मोहीम करण्याचे आदेश आल्यास आम्ही ती यशस्वीपणे पूर्ण करु शकतो,” असंही नरवणे यांनी स्पष्ट केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 1 terrorist killed in encounter with security forces in awantipora msr

ताज्या बातम्या