पावसाळा सुरु होताच विषाणूजन्य आजारांबरोबर डासांमार्फत फैलावणाऱ्या कीटकजन्य आजारांचे रुग्ण वाढण्यास सुरुवात होते. सध्या डेंग्यूचे रुग्ण आढळल्याचे प्रमाण वाढत असून, त्या पार्श्वभूमीवर प्लेटलेट या रक्तघटकाची मागणीही वाढत आहे. त्यात आता उत्तप्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णाला प्लेटलेट्सच्या ऐवजी ‘मोसंबी’चा ज्यूस देण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये प्रदीप कुमार पांडे यांना डेंगूची लागण झाली होती. डेंगूच्या उपचारासाठी पांडे यांना रुग्णालायात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात त्यांना प्लेटलेट्सच्या जागी ‘मोसंबी’चा ज्यूस सलाईन मार्फत देण्यात आला. त्यानंतर पांडे यांचा मृत्यू झाला. ही बातमी वाऱ्यासारखी समाजमाध्यमांत पसरली. पोलिसांनी याची दखल घेत रुग्णालयाला टाळं ठोकलं आहे.

हेही वाचा : दुर्दैवी, दिवाळीसाठी घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; बस-ट्रकमध्ये झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू

पोलीस अधिकारी शैलेश कुमार पांडे यांनी सांगितलं की, मिळालेल्या माहितीनुसार खोटे प्लेटलेट्स विकणाऱ्या १० जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याजवळील प्लेटलेट्सचे अनेक पाउच जप्त करण्यात आले. हे लोक रक्त पेढीतून प्लाज्मा विकत घेत. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या पाउचमध्ये टाकून विकत असत.

हेही वाचा : द्वेषपूर्ण वक्तव्ये रोखा!; स्वत:हून दखल घेऊन कठोर कारवाईचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दरम्यान, अटकेत असलेले लोक रुग्णांना प्लेटलेट्सच्या नावाखाली ‘मोसंबी’चा ज्यूस देत होते का? प्लाज्मा हे अद्याप समोर आलं नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. लवकरच सत्य समोर येईल, असेही पांडे यांनी स्पष्ट केलं. ‘एनडीटीव्ही’ने याबाबतचे वृत्त दिलं आहे.