मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट लागलं असून, अनेक भक्तांवर मृत्यू ओढवला. येथील खटलापूरा मंदिर घाट परिसरात शुक्रवारी सकाळी बोट उलटून ११ जणांच्या मृत्यूची झाला आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावर उपस्थित आहे. बचावकार्य वेगात सुरू असून बेपत्ता भाविकांचा शोध घेतला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खटलापूरा मंदिर घाटवर शुक्रवारी सकाळी गणेश विसर्जनासाठी बोट घेऊन गणेशभक्त गेले होते. बोटीवर प्रमाणापेक्षा जास्त लोक उसल्यामुळे बोट उलटली. या दुर्घेटनेतून नऊ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, ११ जणांना जलसमाधी मिळाली आहे. तर आणखी दोन भाविक बेपत्ता आहेत. एनडीआरफच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.

दरम्यान, दहा दिवसांचा मुक्काम आटोपून गणाधिशांनी आपल्या भक्तांचा गुरुवारी निरोप घेतला. देशभरात जल्लोष, आनंद आणि वियोगाच्या दुःखाची असलेला हा सोहळा संपला. हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा अशी प्रार्थना करत पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचन घेऊन भक्तांनी जड अंतःकरणाने लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 11 bodies recovered at khatlapura ghat in bhopal after the boat nck
First published on: 13-09-2019 at 07:42 IST