नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात आज, शनिवारी लष्करी पातळीवरील चर्चेची बारावी फेरी होणार आहे.  चर्चेला सकाळी साडेदहा वाजता चीनकडील बाजूला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ असलेल्या मोल्दो या ठिकाणी सुरुवात होईल. चर्चेत हॉट स्प्रिंग आणि गोगरा येथे असलेल्या चिनी सैनिकांच्या छावण्या हा प्रमुख विषय असेल. तेथून चीनने माघार घेतलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनने अलीकडेच पूर्व लडाखमध्ये काही ठिकाणी घुसखोरी केल्यामुळे या चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे. सीमेवरील अनेक संघर्ष बिंदूवर चीनने अतिक्रमण करून तेथे कुमक वाढवली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12th round of india china talks today akp
First published on: 31-07-2021 at 01:35 IST