14 year old boy torture मोबाइल चोरल्याच्या संशयातून एका १४ वर्षांच्या मुलाला उलटं टांगून मारहाण करण्यात आली आणि त्याला शॉकही देण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. कोलकाताच्या जवळ असलेल्या साऊथ २४ परगणा येथील महेशतला या ठिकाणची ही घटना आहे. एका जीन्स डायिंगच्या फॅक्टरीत हा मुलगा काम करतो. त्याने फॅक्टरी मालकाचा मोबाइल चोरल्याच्या संशयातून त्याला उलटं टांगून मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर मुलाच्या कुटुंबाने पोलिसात तक्रार दिली आहे.

घटनेचा व्हिडीओ व्हायरल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर या घटनेबाबत माहिती काढत पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केली तसंच या मुलाची तिथून सुटका केली. या मुलाच्या अंगावर मारहाणीमुळे, शॉक दिल्याने गंभीर जखमा झाल्या आहेत. १४ वर्षांचा हा मुलगा जीन्स डायिंगच्या फॅक्टरीत काम करतो. त्याने फॅक्टरी मालकाचा मोबाइल चोरल्याचा संशय त्याच्यावर होता. ज्यानंतर त्याला उलटं टांगून मारहाण करण्यात आली आणि शॉकही देण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करुन एकाला अटक केली आहे. आम्ही या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. आता आम्ही पुढील तपास करत आहोत असं पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

मुलाच्या कुटुंबाने काय म्हटलं आहे?

मारहाण झालेल्या मुलाच्या कुटुंबाने म्हटलं आहे की आमच्या मुलावर खोटा आळ घेऊन त्याला मारहाण करण्यात आली आणि शॉक दिले गेले. जो मोबाइल चोरल्याचा आरोप त्याच्यावर होता तो जर त्याने खरंच चोरला असता तर त्याच्याकडे तो सापडला असता. फटके मारुन आणि शॉक देऊन त्याचा शारिरीक छळ करण्यात आला आम्ही या प्रकरणी फॅक्टरी मालकाच्या विरोधात तक्रार दिली आहे असं मुलाच्या काकांनी माध्यमांना सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल

मारहाण झालेल्या मुलाच्या कुटुंबाने फॅक्टरी मालकाविरोधात रबींद्रनगर आणि महेशतला अशा दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार केली आहे. इस्लामपूर येथील आऊटपोस्टमध्येही त्यांनी संपर्क केला आहे आणि सदर घटनेची दखल पोलिसांनी घ्यावी असं म्हटलं आहे. पीडित आणि आरोपी दोघंही इस्लामपूरचे आहेत आम्ही या प्रकरणात फॅक्टरी मालकाला अटक केली आहे. तसंच मुलावर उपचार सुरु आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. आता यापुढे काय कारवाई केली जाणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.