सीरियात संघर्ष सुरूच असून क्वीसीर शहरात सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात १६ जणांचा बळी गेला आहे. क्वीसीर शहराभोवती राष्ट्राध्यक्ष बशीर असीद यांच्या सैन्याने वेढा दिला आहे. क्वीसीर शहर सामरिक दृष्टय़ा महत्त्वाचे आहे. त्यामुळे असीद आणि त्यांच्या विरोधकांनी या शहरावर लक्ष केंद्रित केले आहे. असद कुटुंबीय शिया आहेत तर असद यांच्या विरोधातील बंडखोर सीरियात बहुसंख्येने असलेले सुन्नी आहेत.