मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे सर्वात महत्त्वाचे विरोधक अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांच्या मृत्यूने देशात निराशा आणि उदासीनतेचे सावट पसरले आहे. मॉस्कोमध्ये नवाल्नी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शेकडो फुले वाहण्यात आली आणि मेणबत्त्या पेटवण्यात आल्या. पण त्या रात्रभरातून तिथून हटवण्यात आल्या. दुसरीकडे, त्यांच्या स्मृतीनिमित्त काढण्यात आलेल्या मोर्चातील किमान १७७ जणांना स्थानबद्ध करण्यात आले.

अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांच्या मृत्यूची अधिकृत सूचना त्यांची ८३ वर्षीय आई लिदुमिला नवाल्नी यांच्याकडे देण्यात आली.

मध्य मॉस्कोमध्ये लुबियान्का चौकात लोकांनी ‘सोलोवेत्स्की स्टोन’ या स्मृतीस्थळाजवळ जमून नवाल्नी यांना श्रद्धांजली वाहिली. ‘सोलोवेत्स्की स्टोन’ हे सोवियत रशियाच्या काळात सरकारी दडपशाहीला बळी पडलेल्यांच्या स्मरणार्थ उभारलेले स्मृतीस्थळ आहे. लिदुमिला यांनीही येथे आपल्या मुलाला श्रद्धांजली वाहिली.

१७७ जण स्थानबद्ध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रस्त्यावर आलेल्या किमान १७७ जणांना रशियामध्ये स्थानबद्ध करण्यात आले अशी माहिती ओव्हीडी-इन्फो या स्वयंसेवी संस्थेने दिली. देशभरातील २१ शहरांमध्ये नवाल्नी यांच्या समर्थनार्थ लोकांनी मोर्चा काढला आणि श्रद्धांजली वाहिली.